महाराष्ट्र बातम्या

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी । ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

ठाणे, दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अडीचशेहुन अधिक विद्यार्थी, बाईकर व नागरिकांनी सहभाग नोंदविला तर यावेळी अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करण्यात आली.

३३ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज, पिक्सन फोटोग्राफी कंपनी, बोरिवली मेडिकल ब्रदरहुड असोसिएशन तसेच युवान ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, सेवानिवृत्त सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट् गवर्नर कैलास जेठानी, रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजचे अध्यक्ष अमित गवस, सेक्रेटरी रेणुका साळवी, लेखा अधिकारी अपर्णा पाटणे, पिक्सन फोटोग्राफी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित श्रीवास्तव, युवान ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील मराठे, डॉ. राजेश पांचाल, राजेश सोळंकी व जयश्री सोळंकी इ. उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण २५० व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये, प्रोफेशनल बायकर्स, बांदिवडेकर, जोशी बेडेकर, ज्ञानसाधना, ज्ञानगंगा या कॉलेजचे विद्यार्थी तसेच कर्मचारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

ही रॅली लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सुरुवात होवून पोखरण रोड नंबर- २ मार्गे पलाई देवी मंदिर, उपवन ठाणे येथे सांगता झाली. समारोप कार्यक्रमात अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करून त्यांना युनिक रजिस्ट्रेशन नंबरचे डोनर कार्ड वाटप करण्यात आले. तसेच रॅलीमध्ये उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी होणाऱ्याना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

रस्त्यावरील अपघातात जखमी व्यक्तींना अवयव दानाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने अवयवदानाचे महत्त्व आपल्या समाजात नसल्यामुळे अनेकजण वंचित राहतात. या वंचितांना अवयव प्राप्त झाल्यास त्यांना पुन्हा नवजीवन मिळू शकते.

एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. तसेच आपण नेत्रदान व शरीरातील पेशींचे दान देखील करु शकतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त 50 जीव वाचवू शकतो. जीवन मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर असणा-या आजारी व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी आपले अवयवदान हे जीवनदायी ठरु शकते, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी । ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी । ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अडीचशेहुन अधिक विद्यार्थी, बाईकर व नागरिकांनी सहभाग नोंदविला तर यावेळी अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

माज कल्याण विभागांतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिदय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता

मतदार ओळखपत्र नाही अशा मतदारासाठी पर्यायी कागदपत्र ग्राह्य - जिल्हाधिकारी

मतदार ओळखपत्र नाही अशा मतदारासाठी पर्यायी कागदपत्र ग्राह्य – जिल्हाधिकारी

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षीत करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे व पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करावयाची असून इच्छूक जमीन मालकांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र एनएसएस NSS च्या 14 विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथा वरील पथसंचलनासाठी सराव

महाराष्ट्र एनएसएस NSS च्या 14 विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथा वरील पथसंचलनासाठी सराव

प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर सध्या राजधानीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी कसून सराव करीत आहेत.

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली

28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद ।

28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद ।

हाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेहाळाव्याचे 24 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.