महाराष्ट्र बातम्या

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Pune ACB) इतिहासात सर्वात मोठ्या ५०० कोटी रुपयांच्या अपसंपदा बाळगल्याबाबतच्या खटल्याचा सर्वात जलद व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे (Police Inspector PI Girish Sonawane) यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (सुवर्ण) जाहीर झाले आहे.

पुणे : PI Girish Sonawane | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Pune ACB) इतिहासात सर्वात मोठ्या ५०० कोटी रुपयांच्या अपसंपदा बाळगल्याबाबतच्या खटल्याचा सर्वात जलद व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे (Police Inspector PI Girish Sonawane) यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (सुवर्ण) जाहीर झाले आहे.

गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासाठी एनआयए, सीबीआय आणि राज्य शासनाचे पोलीस यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट तपास मागविले जातात. त्यात महाराष्ट्रासाठी ११ पुरस्कार असतात. त्यात गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी केलेला हा तपास सर्वोत्कृष्ठ ठरला आहे.

गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्या मालमत्तेचा तपास हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासतील सर्वात मोठा अपसंपदा खटला ठरला. या खटल्यात ८ महिन्यात पहिले दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी दाखल केले होते. १०० हून अधिक साक्षीदारांचे जाब जबाब घेण्यात आले होते. तब्बल ४० हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरु आहे. हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याची उत्पन्नापेक्षा ११६२ टक्के अधिक मालमत्ता आढळली आहे. त्याच्या २० बेनामी मालमत्ता सुरुवातीला उघड झाल्या असून त्यात नंतर अधिक भर पडली होती. हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्या ३८ बेनामी कंपन्या आणि त्यात गुंतविलेला पैसा याचा अतिशय गुंतागुंतीचा हा तपास होता.

या पुरस्काराबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी सांगितले की, केंद्रीय पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यात गुंणवत्तेनुसार माझा पहिला क्रमांक आहे. आपल्या कामाची अगदी केंद्रीय पातळीवरुन दखल घेतल्याचा खूप आनंद आहे. अशा पुरस्कारामुळे अधिक जिद्दीने आणि कठोर मेहनत घेऊन काम करण्याची प्रेरणा मिळते, असे पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी पुणे शहर पोलीस दलात २०१२ ते २०१९ या काळात फरासखाना पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा येथे काम पाहिले आहे. त्यानंतर २०१९ ते २०२३ दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागात ते कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. त्यापैकी एक हा हनुमंत नाझीरकरच्या बेहिशोबी मालमत्तेचा होता. सध्या ते राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एरंडोल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार ए.टी.पाटील उपलब्ध नाहीत मराठी बातम्या

जळगाव : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 परंडा विधानसभा मतदारसंघात राहुल मोटे यांचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी पसरताच रणजित पाटील यांचा मोठा दावा Marathi News

धाराशिव: 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील देवयानी फरांडे यांना मोठा दिलासा, रंजन ठाकरे आणि अंकुश पवार निवडणुकीतून माघार घेणार मराठी बातम्या

नाशिक : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 ...

नवी मुंबईतील वाशी येथील बागेत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

नवी मुंबई : बागेतील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाशी येथे घडली आहे. खेळत असताना मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने ...

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी फातिमाला मुंबई पोलिसांनी पकडले, तपासात मोठा खुलासा

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला यासंदर्भातील संदेश ...

कार्तिक उत्सवासाठी पंढरपुरात 24 तास विठ्ठल दर्शनाला सुरुवात, कोणीही महानैवेद्य योजनेत सहभागी होऊ शकतो

सोलापूर : आषाढी-कार्तिकी भक्त म्हणत राहतात… पंढरपूरच्या पंढरीची मधुर गाणी गायली जातात. त्यामुळे आषाढी वारीनंतर कार्तिकी एकादशीबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता कायम आहे. कार्तिकी सणासाठी येणाऱ्या ...

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024

या बुलेटिनच्या माध्यमातून दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा देण्यात आला आहे. हे राज्य तसेच देशभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा आणि इतर बातम्यांचे अपडेट्स प्रदान ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरंगे पाटील आणि नरहरी झिरवाळ यांच्या भेटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, Marathi News

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल 2024 वाजले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील ...

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी तात्काळ उपचार करा, असा इशारा दिला.

रुपाली पाटील ठोंबरे जितेंद्र आवाडा यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, ही पाकिटमारांची टोळी आहे. हिंमत असती तर अजित पवार म्हणाले असते, शरद ...