📢 महत्वाची माहिती – प्रत्येक ग्रामपंचायत करदात्यांसाठी सुवर्णसंधी!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान — मोठी करसवलत जाहीर!
मुंबई | महाराष्ट्र शासन — ग्रामीण भागातील करदात्यांसाठी राज्य शासनाने एक ऐतिहासिक आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतीतील निवासी मालमत्ताधारकांसाठी मोठी करसवलत जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या या निर्णयामुळे हजारो ग्रामस्थांना आर्थिक मदत मिळणार आहे.
🏠 कोणासाठी लागू?
या योजनेचा लाभ फक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या निवासी मालमत्ताधारकांनाच मिळणार आहे. व्यावसायिक, औद्योगिक किंवा इतर प्रकारच्या मालमत्तांना ही सवलत लागू होणार नाही.
🔍 सवलतीचे मुख्य अटी — प्रत्येक ग्रामस्थांनी लक्षात ठेवाव्यात
- 1️⃣ 2025–26 चा चालू कर वेळेवर भरा
कर वेळेत भरल्यासच शासन सवलतीस पात्र होता येईल. - 2️⃣ 1 एप्रिल 2025 पूर्वीची थकबाकी — फक्त 50% भरा
जुनी थकबाकी पूर्ण भरायची गरज नाही. फक्त अर्धी रक्कम जमा करावी. - 3️⃣ उर्वरित 50% थकबाकी शासन माफ करणार
ही आजवरची सर्वात मोठी करसवलत! ग्रामस्थांवरील कराचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार.













