महाराष्ट्र शासन बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात अटल आवास योजना शहरी / ग्रामीण अंतर्गत बांधकाम कामगारांच्या घरबांधणी करीता जागा उपलब्ध करून देण्याबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, प्रांताधिकारी मिरज डॉ. समीर शिंगटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रतापसिंह जाधव, नगरपालिकेंचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सुमारे 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. याशिवाय ज्या बांधकाम कामगारांची अद्यापही नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी तात्काळ करून घ्यावी. जिल्ह्यातील किती नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे जमीन उपलब्ध आहे, जिल्ह्यात घरांची आवश्यकता असणारे बांधकाम कामगार किती आहेत, त्यासाठी किती जागेची आवश्यकता आहे, उपलब्ध जागा किती आहे, उपलब्ध जागेची मालकी कोणत्या प्रकारची आहे, या सर्व बाबींची तपशिलवार तालुकानिहाय माहिती 28 सप्टेंबर 2022 पूर्वी तयार करावी. या माहिती सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायरान जागांची माहितीही तात्काळ संकलित करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असल्याने ज्या बांधकाम कामगारांनी अद्यापही आपली नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

—

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

गणेश विसर्जन मिरवणुकीत चित्ररथाद्वारे तंबाखू दुष्परिणामविषयी जनजागृती

—

गणेश विसर्जन मिरवणुकीत चित्ररथाद्वारे तंबाखू दुष्परिणामविषयी जनजागृती

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

—

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५० मनपा शाळांचे नूतनीकरण

—

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५०  मनपा शाळांचे नूतनीकरण

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

—

ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

—

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

—

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी “मेरी पॉलीसी मेरे साथ” या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

—

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी "मेरी पॉलीसी मेरे साथ" या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

—

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन

—

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन