नागपूर, दि. ०३ : जिल्हाधिकारी, अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थिती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बायोमेट्रीक प्रणाली 1 सप्टेंबर पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर पासून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीवर नोंदविण्यात आलेल्या उपस्थिती अहवालाचे आधारे वेतन अदा करण्याची कार्यवाही सुरु करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

बायोमेट्रीक प्रणालीवर नोंदविण्यात आलेल्या उपस्थिती अहवाल विचारात न घेता वेतन अदा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, एन. आर.सी. व ई-डीस्ट्रीक्ट प्रोजेक्ट मॅनेजर, महा आयटी यांनी बायोमेट्रीक प्रणालीचा दैनंदिन उपस्थित अहवाल दररोज सकाळी 10.15 वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.