महाराष्ट्र शासन बातम्या

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

शिर्डी, दि.१४ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

कृषी विभागाची विविध कामे, शेततळे, गॅबियन बंधारे, ड्रीप स्प्रिन्क्लर सिंचन, खोलीकरण करणे, पाणीसाठा वाढविणे, पाझर तलावातील गाळ काढणे, नवीन सिमेंटचे बांध बांधणे, जून्या नाल्यांचे पुनरूज्जीवन करून त्यांना उर्जित आवस्था प्राप्त करून देणे या कामांची या शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व ‍जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवार फेऱ्या काढण्यात आल्या. पाथरे बु., तिसगाव, लोणी बु, रांजणगाव खु, सावळीविहीर बु हनुमंतगाव, लोहगाव, हसनापूर, सावळीविहीर खु, ममदापूर, भगवतीपूर, दुर्गापूर, नांदुर्खी खु, नांदुर्खी बु , साकुरी ,दाढ बु, रांजणखोल, नांदूर बु , अस्तगाव, डोऱ्हाळे व शिंगवे या गावांची जलयुक्त शिवार योजना २.० साठी निवड करण्यात आली आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब शिंदे, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता देविदास धापटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, जलसंधारण अधिकारी, ग्रामसेवक, वनरक्षक यांच्या समन्वयातून सर्व गावात नियोजनबद्धरित्या शिवार फेऱ्या पार पडल्या. ह्या शिवार फेरीत गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जलसंधारणासह विविध कामे सुचविण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक - दोन कार्यालय सुरू

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक – दोन कार्यालय सुरू

कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या “स्पार्क” कार्यक्रमाची सुरुवात

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विशेष विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंटरनँशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्पार्क हा पथदर्शी कार्यक्रम जिल्हात राबविण्यात येत आहे." स्पार्क " हा आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.(लाईट फॉर दि वर्ल्ड), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व प्रोकासूट यांच्यासह एक संयुक्त पद्धतीने स्पार्क (SPARK) कार्यक्रम जगातील बुरकिना फासो,भारत, मोझांबिक आणि मालदिव या चार देशात राबविण्यात येत आहे. देशात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २ कोटी ६८ लक्ष व्यक्ती दिव्यांग आहेत,जे एकूण

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या बंजारा ड्रेस मेकिंगवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण/ तलावातील गाळ उपसून तो शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची/ तलावाची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्यास मदत होणार आहे. यासाठी ज्या गावाच्या परिसरात धरण/तलाव आहे आणि त्यामध्ये मोठया प्रमाणात गाळ आहे.