श्रीरामपूर व्यापारी महासंघाच्या वतीने दुकानची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत वाढवून मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले…

Shrirampur 24Tass : श्रीरामपूर शहरामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर शहराप्रमाणे बाजारपेठेतील दुकानांसाठी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे या वेळेनुसार सध्या दुकानदार आपली दुकाने चालवीत आहे गेल्या सहा महिने संपूर्ण बाजारपेठेचे व व्यापाऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच छोटे मोठे दुकानदार यांनासुद्धा मंदीची झळ बसलेली आहे सुरुवातीला दुकाने बंद असल्यामुळे व आता दुकानाची वेळ कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या दुकाने बऱ्या पैकी सुरू असल्याने नागरिक खरेदी साठी बाहेर पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी सायंकाळी पाच वाजेची वेळ अपुरी पडत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना सध्याची वेळ गैरसोयीची होत आहे.

श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात श्रीरामपूर शहरातील सर्व दुकानासाठी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी व अशा प्रकारचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे असे म्हणण्यात आले. कारोना महारोगासाठी शासनाने निर्बंध केलेल्या सर्व नियमांचे पालन श्रीरामपुरातील सर्व व्यापारी दुकानदार छोटे-मोठे व्यापारी करतील तरी याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन बाजारपेठेची व दुकानांची वेळ सकाळी नऊ वाजेपासून ते सायं सात वाजेपर्यंत करावी असे विनती श्रीरामपूर व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी श्रीरामपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक किरण लुनिया,राजेंद्र पाटणी,शिवसेनेचे राजेंद्र देवकर, दीपक दुगड, अहमदभाई जहागिरदार, प्रभाकर अंभोरे, मच्छिंद्र हिंगमिरे ,मर्चंट असोसिएशनचे संजय शहा, पुरुषोत्तम मुळे, सोमनाथ महाले,  संतोष उदावंत,अनिल नागरे, शशिकांत लोढा, शशी तुपे ,सचिन डोळस ,अभिजीत भावसार, पंकज शिंगारे, संजय पांडे ,देविदास चव्हाण, भाऊसाहेब वाकचौरे ,अमोल महाले ,विजय डबीर ,भरत धोराजीवाले, दिलीप विळस्कर,विजय शेलार,गणेश भिसे आदी व्यापाऱ्यांच्या या निवेदनावर सह्या होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *