महाराष्ट्र बातम्या

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक – मान्यवरांचे सूर

अकोला,दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा असून अनेक बोलीभाषेने ती समृद्ध झाली आहे. मराठी भाषा केवळ एक संवादाचे माध्यम नसून आपल्या वागण्या, बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृतीचा परिचय देतो. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेविषयी अभिमान बाळगून ती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्व मान्यवरांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचे’ शुभारंभ महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, मराठी विभागाचे डॉ. सुलभा खर्चे, इंग्रजी विभागाचे डॉ. विवेक हिवरे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, मयुर लहाने, महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट म्हणाले, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. विविध बोलींचा समावेश असलेली ही भाषा समृद्ध झाली आहे. कथा,कादंबरी,काव्य अशा विविध साहित्य प्रकारांनी ही भाषा अधिक व्यापक बनली आहे. या भाषेच्या समृद्धीसाठी महाविद्यालया मार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी दिली.

दैनंदिन आयुष्यात समाजमाध्यमांवरील मराठी भाषेच्या सहज वापराबाबत मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही आपली मायबोली असून आपल्या भावभावना त्यातून अधिक समर्पकपणे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळेच मराठी भाषिक असल्याचा अभिमान आपण प्रत्येकाने बाळगावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे सदस्य पुष्पराज गावंडे म्हणाले की, मराठी भाषेला लिपी असलेली समृद्ध भाषा आहे. त्यांचा वापर नवमाध्यमांमधून केला जावा. तसेच तरुणाईने त्यासाठी मराठी भाषा समाजमाध्यमांवरही समृद्ध करावी. मराठी भाषा हे आयुष्याचा अविभाज्य भाग असून त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी जिल्हा मराठी समितीव्दारे राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मराठी भाषेचा प्रशासकीय वापरात सक्तीचे असून प्रत्येकांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी सहकार्य आवश्यक असून त्यांचा प्रचार -प्रसारात प्रत्येकांने योगदान देण्याचे आवाहन यावेळी केले.

मराठी भाषा संवर्धनसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात आपलेही योगदान देणे आवश्यक असून दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मायबोली भाषेचा वापर करावा. तसेच दैनंदिन व व्यावसायिक जीवनामध्ये मराठी भाषेच्या वापर करावा. यामुळे भाषा संवर्धनासह मराठी भाषेतील रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. त्यामुळे सगळ्यांनी अभिमानाने मराठी बोला, वाचा आणि लिहा, असा संदेश मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य श्याम ठक, डॉ. विनय दांदळे व मयुर लहाने यांनी आपल्या संबोधनात दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाचे डॉ. सुलभा खर्चे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शताब्दी धांडे यांनी तर गणेश मेनकार यांनी आभार मानले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक - मान्यवरांचे सूर

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक – मान्यवरांचे सूर

मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा असून अनेक बोलीभाषेने ती समृद्ध झाली आहे. मराठी भाषा केवळ एक संवादाचे माध्यम नसून आपल्या वागण्या, बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृतीचा परिचय देतो. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेविषयी अभिमान बाळगून ती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्व मान्यवरांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्थानिक प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने दि. 01 जानेवारी ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

अंमली पदार्थाच्या वापरास आळा घालण्यासाठी पोलीसांनी धडकपणे कार्यवाई करावी । नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी अंमली पदार्थांबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यात डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या 113 ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये निवडणूक लढविलेल्या 2 हजार उमेदवारांनी आपल्या निवडणूक काळातील खर्चाचा हिशोब दि.20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूकचे प्रभारी अधिकारी यांनी केले आहे.

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारपासून आकाशवाणी केंद्रावर

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोली जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणी परभणी केंद्र प्रमुख सतिष जोशी यांनी केले आहे.

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील । अक्कलकोट व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत सूचना

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची मोठया प्रमाणावर लागन झाल्याने राज्यात जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुक करणे यावर बंदी घालण्यात आली होती. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून वाहतुक व बाजारास मान्यता देण्यात आली आहे. मात्र अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.