महाराष्ट्र बातम्या

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. १५ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी लॉगीनवरील प्रलंबित, नवीन भरावयाचे अर्ज मंजुरीकरिता महाविद्यालयामार्फत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या लॉगीनवर ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (फ्रीशीप), राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास दिनांक 21 सप्टेंबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.

अद्यापही अनेक महाविद्यालयांच्या ‘कॉलेज’ लॉगीनवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे पाच हजार 313 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच विद्यार्थी लॉगीनवर 796 अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पाच हजार 622 अर्ज ‘कॉलेज’ लॉगीनवर, तर विद्यार्थी लॉगीनवर 680 अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीची विहीत कालमर्यादा लक्षात घेवून सर्व संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी आपले लॉगीनवरून प्रलंबित तसेच नवीन भरावयाचे अर्ज मंजुरीसाठी महाविद्यालयामार्फत पात्र प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांच्या लॉगीनला ऑनलाईन फॉरवर्ड करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापूर्वी आधार संलग्नित ‘युजर आयडी’ तयार करून अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नवीन ‘नॉन आधार युजर आयडी’ तयार करू नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास आणि एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयाची राहील, असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्सियल पब्लीक सकुलमध्ये प्रवेशासाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील.

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालय आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा व खुल्या गटासाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.

वसतिगृह सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांना संपर्क साधण्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचे आवाहन

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.

गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी

गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी

पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी आता प्रत्येक गावातील पाच महिला एफटीके किटद्वारे गावातच करणार आहेत. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांना या करीता प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी मोहाडी आणि तुमसर पंचायत समितीस्तरावर महिलांना एफटीके (Ftk kit) द्वारे पाणी तपासणी प्रात्यक्षिकाचे धडे देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी यांचे हस्ते एफटीके किटचे वितरण करण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पशुसंवर्धन विभागाच्या सन 2022-23 या वित्तीय वर्षात नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 13 डिसेंबर, 2022 ते 11 जानेवारी, 2023 या कालावधीत https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपवर अर्ज स्वीकारण्यात आले होते.

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत "लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजना" राबविण्यात येत आहे. यामध्ये किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले आहे.