महाराष्ट्र शासन योजना

जालना,दि. 10 जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 2023 या नवीन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयात जागेवर निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहीमेतंर्गत बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. तरी नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींनी वेळेवर उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन
जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये
सहभागी होवून रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 2023 या नवीन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येत आली असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या कार्यालयात जागेवरच निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. याप्रमाणे जानेवारी महिन्यातील बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. यासाठी लक्ष्मी कॉटस्पीन, सामनगांव रोड जालना यांची आयटीआय फिटर/इलेक्ट्रीशियन साठी 10 पदे, आणि विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.जालना यांची आयटीआय मशिनीस्ट/फिटर/ इलेक्ट्रीशियन साठी 10 पदे अशी एकूण 20 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. यासाठी नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. (महाराष्ट्र शासन उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना)

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम औरंगाबाद विभाग व नंतर जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR-1 (2022-23) JALNA याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. सदर आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपस्थित असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवावेत. (महाराष्ट्र शासन उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना)

SPECIAL JOB FAIR-1 (2022-23) JALNA करिता बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेसाठी बदनापूर शहरात इमारत भाडे तत्वावर देण्याचे आवाहन…

समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेसाठी बदनापूर शहरात इमारत भाडे तत्वावर देण्याचे आवाहन…

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केपी’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर बुधवार ११ जानेवारी रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून फेरफार अदालत आयोजित करण्यात येते.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ । Placement Drive at Pune | पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर

नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यापुढे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

निवासी शाळा व वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

दौंड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सर्व्हेक्षण मोहिम गतीमान करुन गोवर रुबेलाचे लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय