महाराष्ट्र शासन बातम्या

पुणे दि. ७ : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंती सोहळा कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चंद्रकांत बावनकुळे, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम- अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य काय असते ते दाखवून दिले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती होती. त्यांच्यामागे अठरा पगड जातीचे मावळे होते.

शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यकारभार करतांना त्यांनी सनद निर्माण केली. त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले.

*महामंडळासाठी १०० कोटी, स्मारकासाठी ५ कोटी देणार*

रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी आमदार श्री. पडळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे चंद्रकांत खोमणे, रमण खोमणे, तानाजी खोमणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन….

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट • राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह  इतर गणेश मंडळांना भेट • राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मासिक शिबीर दौरा कार्यक्रम आयोजित | RTO Camp in Washim District

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जिल्हा दौरा

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जिल्हा दौरा

जनकल्याणाच्या योजना – प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना

जनकल्याणाच्या योजना - प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार - मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन