करिअर | नोकरी संधर्भ

नांदेड दि. 22 ऑगस्ट 2022 (आजचा साक्षीदार):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून आय Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत...

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी यांचे आवाहन…

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन...

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार  मंत्री भूपेंद्र यादव

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 077 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 077 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

सैनिकी मुलांच्या वसतीगृहासाठी अधीक्षक भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

सैनिकी मुलांच्या वसतीगृहासाठी अधीक्षक भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश….

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश....

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..