करिअर | नोकरी संधर्भ

शिर्डी, दि.२० ऑगस्ट 2022 – श्री साईबाबा संस्‍थानमधील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांच्‍या प्रश्‍नांबाबत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी आपली प्राथमिक चर्चा झाली असून, हे प्रश्‍न कायमस्‍वरुपी मार्गी लावण्‍यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करुन निर्णय करण्याची ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळास दिली.

संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आपल्‍या प्रलंबित मागण्‍यांसाठी कर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळाने लोणी येथे महसूलमंत्र्यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यापूर्वी कर्मचारी संघटनेने आपल्‍या मागण्‍यांकरिता आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतू प्रश्‍न मार्गी लावण्‍याबाबत शिर्डी दौ-यात आश्‍वासीत केल्‍यानंतर संघटनेने आपले आंदोलन स्‍थगित केले होते.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्‍या समवेत संघटनेच्‍या शिष्‍टमंडळाची लोणी येथे पुन्‍हा सविस्‍तर चर्चा झाली. कंत्राटी कर्मचा-यांच्‍या संदर्भात माझी नेहमीच सकारात्‍मक भूमिका राहिली. यापूर्वीही आपण व्‍यक्तिगत लक्ष घालून यापुर्वी प्रश्‍न मार्गी लावला होता. उर्वरित ५९८ कर्मचा-यांच्‍या बाबतीत सुध्‍दा आपली हीच भूमिका असून, त्‍यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी आपण कटिबध्‍द आहोत असे सांगतानाच या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या समवेत आपली प्राथमिक चर्चाही झाली आहे. लवकरच विभागाचे सर्व वरिष्‍ठ आधिकारी आणि संस्‍थानच्‍या आधिका-यांसमवेत मुंबई येथे बैठक आयोजित करुन, तुमचे सर्व प्रश्‍न मार्गी लावू .अशी ग्‍वाही महसूलमंत्र्यांनी कर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळास दिली.

याप्रसंगी दिपक तुरकणे, अनिल कोते, रामनाथ थोरात, गोटीराम दाडे, सुनिल मांजरेकर, सर्जेराव गोरे, दिपक जगताप, सुनिल गव्‍हाणे, श्री भवर यांच्‍यासह कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आर. ए. महाविद्यालययात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

आर. ए. महाविद्यालययात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर…

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या  संकेतस्थळावर जाहीर...

स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती…

स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती...

अन्नप्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवडा…

अन्नप्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवडा…

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती… समाज कल्याणच्या लॉगीनला तातडीने अर्ज मागविले…

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती... समाज कल्याणच्या लॉगीनला तातडीने अर्ज मागविले...

राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू…

राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू...

सीमा रस्ते संघटनेत विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी!

सीमा रस्ते संघटनेत विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी!

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी दि. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीचे आयोजन…

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी दि. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीचे आयोजन...