महाराष्ट्र शासन योजना

हिंगोली, दि. 02 : जिल्ह्यात दिपावली-2022 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी दि. 12 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने एकमेकांपासून कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत. केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना परवानगी देण्यात येणार नाही. व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

जमनी येथे रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

केरोसिनचे सुधारित दर जाहीर…

केरोसिनचे सुधारित दर जाहीर...

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन…

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन...

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार…

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार...

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव दि. ०१: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.होते आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री ...