महाराष्ट्र शासन योजना

पुणे, दि. ३०: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अंगणवाडी केंद्रे, शासकीय संस्थांसोबतच मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आणि अशासकीय संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प (क्र. २) यांच्या कार्यालयाने दिली आहे.

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

प्रधानमंत्री कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून २०१८ मध्ये महिला व बाल विकास विभागाअंतर्गत पोषण अभियानाची सुरवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकाचे आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्यादृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावर्षीच्या पोषण महिन्यामध्ये महिला व स्वास्थ्य, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ या बाबीवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे.

पोषण- महापोषण अभियान उपक्रमामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व १ हजार ४१३ अंगणवाडी केंद्र स्तरावर विविध स्पर्धा, शिबीरे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. बी. शिर्के यांनी कळवले आहे.

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

पोषण महिन्यानिमित्त सप्टेंबरमध्ये विविध कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी

धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन…

धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन...

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण प्रकाशित ‘महा आवास त्रैमासिक ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण प्रकाशित 'महा आवास त्रैमासिक ' चे प्रकाशन करण्यात आले.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

पर्यावरणाला बाधा पोहोचविणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्राकडे सुर्पूद कराव्यात

वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश | जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा

वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश | जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा – खासदार डॉ. अनिल बोंडे

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा - खासदार डॉ. अनिल बोंडे

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा

जिल्हास्तरीय जादूटोना विरोधी कायदा समिती जादूटोना निर्मूलनासाठी जनजागृती मोहिम राबवा