महाराष्ट्र शासन योजना

दहशतवादी कारवायांच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

अहमदनगर, ७ सप्टेंबर – दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून ‍जिल्ह्यात ६ सप्टेंबर पासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक/मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस/ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते व जूने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संशयास्पद, अनोळखी व्यक्तींची माहिती न लपविता तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात यावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशातून केले आहे. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याबरोबरच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लागू करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घरमालकांनी, घर भाडेकरूंना भाड्याने घर देतांना भाडेकरुबाबतची सर्व सविस्तर माहिती घेवून त्यांचे ओळखपत्र, (उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र) फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी. व अहमदनगर पोलीस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावी.

अहमदनगर जिल्ह्यातील लॉज मालकांनी आपणाकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रासहित संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंद व सही विहीत नमुन्यातील रजिस्टरला घेऊनच प्रवाशांना लॉज मध्ये प्रवेश द्यावा. तसेच प्रवाश्यांची घेण्यात आलेली सर्व माहिती रेकॉर्ड 2 वर्षापर्यंत जतन करुन ठेवावे.

अहमदनगर जिल्ह्यातील सायबर कॅफे चालक / मालक यांनी येणारे ग्राहक महिला / पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. एखाद्या संशयीत व्यक्तिस इंटरनेट वापरासाठी देऊ नये. इंटरनेटचा वापर करणारे आक्षेपार्ह वेबसाईटवर सर्च करतात अगर कसे याबाबत सायबर चालकांनी लक्ष ठेवावे. तसेच एखादी आक्षेपार्ह वेबसाइट सुद्धा वापरण्यास / आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास वेबसाईट वापर करु देऊ नये.

अहमदनगर जिल्ह्यातील मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी, मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र व फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी व आपले विहित नमुन्यातील रजिष्ट्ररवर त्यांचा फोटो चिकटवून त्यांची इत्यंभूत माहिती नोंदवावी. जेणेकरून सीमकार्डचा दुरुपयोग होणार नाही. यापूर्वी ज्या व्यक्तीचे नावाचे सिमकार्ड आहे त्याच्या संमतीशिवाय इतर अनोळखी व्यक्ती सिमकार्ड वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नये म्हणून वितरकांनी दक्षता घ्यावी.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रिंटिंगप्रेस, ऑफसेट चालकांनी आपणाकडे धार्मिक मजकूर छापतेवेळी माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तिचे ओळखपत्र आवश्यक घ्यावे. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापले जाणारे सर्वच निमंत्रणपत्रिका, माहितीपत्रके, बॅनर, भित्तीपत्रके इत्यादी प्रेसचे ठळक नाव छापून मोबाईल नंबर दर्शवावा.

अहमदनगर जिल्ह्यातील विस्फोटक गोदाम परवानाधारक यांनी विस्फोटक / ज्वलनशील साठा ठेवणे, विक्री/खरेदी करणे इत्यादी ठिकाणी नेहमी विस्फोटक वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण-घेवाण / खरेदी-विक्री करतांना योग्य ते कायदेशीर नियम अटी व शर्तीचे पालन करावे. व्यवहार झालेल्या व्यक्तींचा ओळख तपशील घ्यावा व अभिलेख अद्यावत ठेवावे. सदर ठिकाणी पोलीस प्रशासना मार्फत वेळोवेळी तपासणी करावी.

अहमदनगर जिल्ह्यातील भंगार विक्रीतील मोटार- सायकलच्या वस्तू व इतर वस्तू यांचा उपयोग देशविघातक घातक कृत्ये करणेसाठी केल्याचे दिसुन आले आहे. त्या अनुषंगाने भंगार खरेदी विक्री करणारे दुकान मालक व चालक यांनी माल विकत घेतांना व विक्री करतांना संबंधित व्यक्तिचे ओळखपत्र पत्ता मोबाईल नंबर सह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विहित नमुन्यातील रजिस्टर ठेवून त्यावर नोंद घेण्यात यावी. तसेच पोलीस प्रशासनामार्फत वेळोवळी तपासणी करतेवळी सदर अभिलेख उपलब्ध करावा.

अहमदनगर जिल्ह्यातील जुने वाहन खरेदी विक्री करणा-या दुकानदार चालक / मालक यांनी नमूद वाहन विक्री करणारा व खरेदी करणारे व्यक्तींची माहिती ओळखपत्र पत्ता मोबाईल नंबर सह विहित रजिस्टरला घेऊन ती खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवूनच मोटार वाहन अधिनियम प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश अहमदनगर शहर व जिल्ह्यात पुढील दोन महिन्यासाठी लागू राहतील.असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.

दहशतवादी कारवायांच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

दहशतवादी कारवायांच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५० मनपा शाळांचे नूतनीकरण

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५०  मनपा शाळांचे नूतनीकरण

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी “मेरी पॉलीसी मेरे साथ” या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी "मेरी पॉलीसी मेरे साथ" या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन